सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi Best 100 Words

या पोस्ट मध्ये आपण सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध / Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi 100 शब्दांमध्ये निबंध लेखन करणार आहोत

Surya Ugavala Nahi tar Essay In Marathi

निबंध लेखन – सूर्य उगवला नाही तर…

[मुद्दे : सूर्य उगवला नाही, तर मजाच मजा – खूप खेळणे – शाळा, अभ्यास नसणे – पण रंगीबेरंगी जग पाहता येणार नाही- शाळा, मित्र नसतील वनस्पती, पाणी नसेल – माणूस जिवंत राहणार नाही – पृथ्वी निर्जीव.]

सूर्य उगवला नाही, तर? वा! किती मजा येईल! रात्र संपणारच नाही. मग खूप वेळ दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येतील. लवकर झोपावे लागणार नाही. लवकर उठण्याची कटकट नसेल. गृहपाठ पूर्ण करण्याची गरज नसेल. शाळेत जावे लागणार नाही. सगळी मज्जाच मजा होईल.

मात्र, सूर्य खरोखरच उगवला नाही, तर…? तर खूप तोटा होईल. आपण सूर्योदयाचा व सूर्यास्ताचा देखावा पाहू शकणार नाही. कधी कधी आकाश किती रंगीबेरंगी झालेले असते! हे दृश्य मग कधीच दिसणार नाही. सगळीकडे काळोखच असेल, मग कुठेच जाता येणार नाही. काही पाहता येणार नाही. शाळा नसेल आणि मित्रही नसतील!

एवढेच कशाला? सूर्य नसला, तर वनस्पती कर्बग्रहणाची क्रिया करू शकणार नाहीत. म्हणजे वनस्पती नसतील. मग आपल्याला अन्न कुठून मिळेल? सूर्य नसला, तर ढग नसतील, पाऊस नसेल. आपल्याला पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे? खरे म्हणजे सूर्य नसेल, तर पृथ्वी निर्जीव होईल. बाप रे! छे, छे! सूर्य हवाच! तो उगवलाच पाहिजे!

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • सूर्य उगवला नसता तर मराठी निबंध / Surya Ugavala Nasta Tar Marathi Nibandh
  • सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीमध्ये / Essay on Surya Ugavala Nahi Tar 
  • सूर्य उगवला नाही तर निबंध लेखन दाखवा / Surya Ugavala Nahi Tar Essay writing In Marathi

तुम्हाला सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध लेखन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद