माझी आजी मराठी निबंध | My Grandmother Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझी आजी निबंध | Mazi Aaji Nibandh In Marathi लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majhi Aaji Marathi Nibandh / माझी आजी मराठी निबंध

My Grandmother Essay In Marathi  माझी आजी मराठी निबंध

My Grandmother Essay In Marathi

वर्णनात्मक निबंध – माझी आजी

[मुद्दे : आजी साठ वर्षांची – नेहमी उत्साहात – आजारी, थकलेली कधीही नाही – स्वत: वक्तशीर – मला वक्तशीर राहण्याचा आग्रह – अभ्यासात मदत – घरातील लहानसहान कामे – घर नीटनेटके ठेवणे – स्वयंपाकात मदत – आईबाबा आजीचा सल्ला घेतात संध्याकाळी तास-दोन तास मैत्रिणींशी गप्पा- मैत्रिीमध्ये आजी प्रिय.]

माझी आजी आता साठ वर्षांची झाली आहे. ती नेहमी उत्साहात असते; हसतमुख असते. ती कधीही थकलेली दिसत नाही. ती आजारी पडलेली मी कधीही पाहिली नाही. आजी घरात असली की, आमचे घर प्रसन्न असते.

माझी आजी सकाळी लवकर उठते. सगळ्यांच्या आधी आंघोळ करते. मग मला उठवते. मला रोज सूर्यनमस्कार घालायला लावते. ती मला अभ्यास वेळेवर करायला लावते. जेवणही वेळेवर घेतले पाहिजे, असा तिचा आग्रह असतो.

मी वक्तशीरपणे वागलो नाही, तर ती माझा कान धरते. तीच मला अभ्यासात मदत करते. तिच्यामुळे
माझा निबंध वर्गात सर्वोत्कृष्ट ठरतो.आजीला घर नीटनेटके आवडते. ती आईला स्वयंपाकात मदत करते. आईबाबा नेहमी तिचा सल्ला घेतात. मला माझी आजी खूप आवडते.

वरील निबंध हा खालील विषयांनवर देखील लिहू शकता

  •  माझी आजी निबंध मराठी / mazi aaji nibandh marathi
  • आजी निबंध मराठी /  aaji nibandh marathi
  • आमची आजी वर  निबंध / my grandma essay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझी आजी मराठी निबंध | Essay On Majhi Aaji In Marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद