माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | My Favourite Teacher Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझे आवडते शिक्षक निबंध लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Maze Avadte Shikshak Marathi Nibandh / माझे आवडते शिक्षक मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक निबंध

[मुद्दे : वर्गशिक्षक – आवडते शिक्षक – शिकवणे उत्तम – खूप पाठांतर पाठ्यपुस्तकाबाहेरची उदाहरणे – नीटनेटका पोशाख – सुंदर हस्ताक्षर – अन्य उपक्रमांमध्ये सहभाग – सर्वांशी समानतेने वागणे.]

सगळ्या शिक्षकांमध्ये मला आमचे वर्गशिक्षक श्री. देसाई सर खूप आवडतात. आमच्या वर्गातल्या सर्व मुलांचे ते आवडते शिक्षक आहेत.

हे पण वाचा : परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध

देसाई सर आम्हांला मराठी आणि इतिहास हे विषय शिकवतात. ते तल्लीन होऊन शिकवतात. त्यांचे शिकवणे आम्हां सर्वांना खूप आवडते. त्यांचे पाठांतर खूप चांगले आहे. कविता शिकवताना पाठ्यपुस्तकाबाहेरची कविताही वर्गात म्हणून दाखवतात. शिकवताना शब्दांच्या गमतीही सांगतात. इतिहास शिकवताना इतिहासातील खूप महत्त्वाचे प्रसंग सांगतात. त्यामुळे ते शिकवत असताना आम्ही गुंग होऊन जातो.

देसाई सरांचा पोशाख नीटनेटका असतो. त्यांचे हस्ताक्षर सुरेख आहे. ते फळ्यावर लिहितात, तेव्हा फळा सुंदर दिसतो. त्यांना वर्गातील सर्व मुलांची नावे पाठ आहेत. ते सर्व उपक्रमांमध्ये आम्हांला मार्गदर्शन करतात. ते सर्वांशी समानतेने वागतात.

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझे आवडते शिक्षक मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद