नवरात्री रंग २०२४: ३ ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री सुरु होत आहे, जी ११ ऑक्टोबरपर्यंत चालेल. या नऊ दिवसांत भक्त उपवास धरतात आणि माँ दुर्गेची विशेष पूजा-अर्चना करतात. या नवरात्रीत प्रत्येक दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे, याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे. जाणून घ्या शारदीय नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी कोणते रंग शुभ मानले जातात.
Navratri Colours 2024 Marathi

नवरात्रीचे नऊ रंग २०२४ आणि महत्त्व
३ ऑक्टोबर २०२४, पहिला दिवस
पिवळा रंग- आनंद आणि भक्तीचे प्रतीक
४ ऑक्टोबर २०२४, दुसरा दिवस
हिरवा रंग– वाढ आणि सौहार्दाचे प्रतीक
५ ऑक्टोबर २०२४, तिसरा दिवस
राखाडी/करडा रंग– स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक
६ ऑक्टोबर २०२४, चौथा दिवस
नारंगी/केशरी रंग– ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक
७ ऑक्टोबर २०२४, पाचवा दिवस
पांढरा रंग– शांती आणि शुद्धतेचे प्रतीक
८ ऑक्टोबर २०२४, सहावा दिवस
लाल रंग– शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक
९ ऑक्टोबर २०२४, सातवा दिवस
निळा रंग– संरक्षण आणि शांतीचे प्रतीक
१० ऑक्टोबर २०२४, आठवा दिवस
गुलाबी रंग– प्रेम आणि करुणेचे प्रतीक
११ ऑक्टोबर २०२४, नववा दिवस
जांभळा रंग– महत्वाकांक्षा आणि ज्ञानाचे प्रतीक